युवा मतदारांना प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती, 25 जानेवारीः युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून भारतीय लोकशाही बळकट करावी आणि नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीचे कार्य करण्यात महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

बारामती तहसील कार्यालयात आज, 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 13वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विजय पाटील, परीविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे, तुषार गुजवटे, शाळांचे प्राचार्य, सहकारी शिक्षक, मार्गदर्शक, पालक, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

केंद्रीय कृषि सहसचिवांची प्रक्रिया उद्योगांना भेट

ते पुढे म्हणाले, मतदान हे लोकशाहीने आपल्याला दिलेले महत्वाचे कर्तव्य आहे. मतदान करून आपला हक्क व जबाबदारी पूर्ण करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार नोंदणीतून आणि मतदानामध्ये सक्रीय सहभागातून होत असल्याने युवकांनी यात पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्रताधारक भारतीय नागरिकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत तहसिल कार्यालयाच्या निवडणूक शाखेमार्फत बारामती येथील धो. आ. सातव (कारभारी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेवून मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच शाहू हायस्कूल आणि धो. आ. सातव (कारभारी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयायातील विद्यार्थ्यांनी आज, 25 जानेवारी 2023 रोजी सायकल रॅली द्वारे शहरात मतदान जनजागृती केली.

भीमा नदीमधील सामूहिक आत्महत्येत नवे वळण!

या कार्यक्रमात उपस्थितांनी राष्ट्रीय मतदान दिनाच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा व मतदान नोंदणीमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पारितोषिक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

बानपकडून सातवांना अभय आणि गरिबांना भय!

निवडणूक आायोगाचा 25 जानेवारी हा स्थापना दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारामंध्ये मतदाना विषयी जनजागृती व्हावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी, या उद्देशाने या दिवशी वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून कोणी वंचित राहू नये, असेही कांबळे यावेळी म्हणाले.

One Comment on “युवा मतदारांना प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *