महाराष्ट्रात महापुरुषांचे अपमानच!
राजकारण पेठ घेत आहे, तर काही समाज कंटकात हे पेटलेले राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी आगडोब बनवत आहे. युगपुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना दरोडेखोर म्हणणारे भारतचे पहिले मा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा निषेध त्यांचे अनुयायी करताना आज तर दिसत नाही. तर, ‘ज्याला नाही खायला पीठ, तो मागतो कशाला विद्यापीठ’ असे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले विधान समस्त आंबेडकर समाजाबद्दल केलेले विधान याचा निषेध कोण करणार?
रोहित पवारांकडून पालकांना मार्गदर्शन
खैरलांजी हत्याकांडमध्ये आंदोलन करताना ‘नक्षलवादी’ म्हणणारे स्वर्गवासी आर. आर. पाटील यांचा निषेध कोण करणार? हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री ‘छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणण्याची गरज नाही’, असे म्हणणारे पद्मभूषण मा. शरदचंद्र पवार साहेबांचा कोण निषेध करणार?
बालवयात विवाह बध झालेले राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या बद्दल यांचा अपमान करणारे रामायण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध कोण करणार? ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसताना बौद्ध धर्म स्वीकारला’, असे म्हणाणारे केंद्रीय सामाजिक मंत्री मा. रामदास आठवले यांचा निषेध कोण करणार?
बारामतीत पीक विमा सप्ताह उपक्रमाचा शुभारंभ
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या समर्थनात रयत शिक्षण संस्थेने पत्र काढले आहे. त्या पत्रात चंद्रकांत पाटलांचा निषेध केला आहे. परंतु त्यांच्या कर्मवीरांच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांच्या वारसांचा व त्यांच्या रक्ताच्या वारसांना बाजूला करून तहात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद भूषवणारे, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे व शिक्षण माफिया तयार करण्यायाचं कोण निषेध करणार?
चंद्रकांत पाटलांचा निषेध तर करायला पाहिजेच! कराल तेवढा कमीच आहे. परंतु महापुरुषांच्या विचाराचा अपमान करणाऱ्या कडू औलादींचा निषेध कोण करणार? देणगी देतील हेच भिकार चोट, भिका मागून मोर्चा आंदोलन करतील, राजकारणांच्या राजकारणाला बळी पडतील, गटा तटातील भीक नावाची देणगी देतील आणि विषय भरकवतील, सावधान!! सत्तेच्या गणितात तुमचा वापर तर होत नाही ना? चंद्रकांत पाटलांचा निषेध करताना योग पुरुषाच्या विचारांचा आचरणात बदल करून निषेध व्यक्त करा!
जय भीम!
One Comment on “चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त करताना?”