बारामती, 23 डिसेंबरः केंद्र सरकारने सुधारित विद्युत बिल 2022 आणून संसदेत एकतर्फी पद्धतीने पारित केले आहे. यामुळे वीज उद्योगाचे खाजगीकरण करून ते उद्योग भांडवलदारांना देण्याच्या प्रयत्नात आहेत. केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी तसेच या सुधारित विद्युत बिल 2022 चा निषेध करण्यासाठी बारामती येथील ऊर्जा भवन येथून शहरात 22 डिसेंबर 2022 रोजी वीज कर्मचाऱ्यांकडून दुचाकीवरून निषेध रॅली काढण्यात आली होती.
शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीचा समारोप हा बारामती ऊर्जा भवन येथे करण्यात आला. यावेळी रॅली समारोपानंतर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध सभेत मान्यवरांनी आपापली मते व्यक्त करून सुधारित विद्युत बिल 2022 चा विरोध करून निषेध व्यक्त केला. तसेच खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शविला.
बारामतीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
सदर सुधारित विद्युत कायदा येण्यापूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महाराष्ट्रात स्वतंत्र कृषी ग्राहकांकरीता वीज कंपनी स्थापन करणे, महापारेषणमध्ये अदानी सारख्या भांडवलदाराला द्वार खुले करणे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात असलेले जलविद्युत केंद्राचे पुनर्निर्माण करण्याच्या नावाखाली खाजगीकरण करणे, हजारो जागा रिक्त ठेवून कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार नेमून काम करणे, वीज कंपन्यातील दैनंदिन करत असलेले काम इनपॅनेलमेंटद्वारे खाजगी कंत्राटदारांना देणे, उपकेंद्रे ठेकेदारी पद्धतीने चालविणे आदी मार्गाचा अवलंब करून वीज कंपन्यांमध्ये खाजगीकरण छुप्या पद्धतीने करण्याची सुरुवात केली आहे.
वाढदिवसानिमित्त मुर्टी गावात वृक्षारोपण
यामुळे राज्यातील महावितरण कंपनी, कृषी ग्राहकांकरीता स्वतंत्र कंपनी, महापारेषण कंपनी, महानिर्मिती लघु जल विद्युत प्रकल्प, महानिर्मिती कंपनी या पाचही कंपनीमधील वीज कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज, 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 च्या सुमारास वीज अधिकारी आणि कर्मचारी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.
2 Comments on “बारामतीत वीज कर्मचारी, अभियंता संघटनेची निषेधार्थ रॅली”