बारामती, 7 फेब्रुवारीः बारामती शहरासह तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवर कारवाई करण्यासाठी, तसेच व्हीआयपी नंबर प्लेट (नंबर प्लेटमध्ये बदल करणाऱ्यांवर), फॅन्सी नंबर प्लेट टाकणाऱ्यांवर, ज्यांचे नंबर लगेच कळून येत नाहीत, अशांवर कारवाई करण्यासाठी तसेच वाहनांची कागदपत्र वैद्य नसणे, ऊस वाहतूक चालकांचे मुदतबाह्य व समाप्त झालेल्या लायसन्स चालकांवरती कारवाई करण्यासाठी आणि सीएनजी टाकीचे हायड्रो टेस्ट केलेले प्रमाणपत्र, हायड्रो टेस्ट ट्रॅव्हल प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटना बारामती यांच्याकडून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर (आरटीओ) आज, 7 फेब्रुवारी 2023 पासून आंदोलन सुरू आहे.
तहसिल कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी
सदर आंदोलनाची माहिती ‘भारतीय नायक’च्या वार्ताहराशी प्रबुद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड, अध्यक्ष अभिजीत कांबळे व ओंकार माने, सुशील कांबळे, गणेश जाधव व आशिष भोसले यांनी दिली. सदर मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे प्रबुद्ध युवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बारामतीतील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
One Comment on “विविध मागण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटनेकडून आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन”