चोपडजमधील कथित भ्रष्टाचार विरोधात पुण्यात आंदोलन

बारामती, 16 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील चोपडज गावात ग्रामपंचायतीकडून 2021 मध्ये व्यायाम शाळा उभारण्यात आली. सदर व्यायाम शाळेच्या बांधकामात अनियमिता तसेच भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी अहवालात उघड झाले आहे.

पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक

मात्र चोपडज येथील कथित व्यायाम शाळेच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या संबंधित लोकांवर कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे चोपडज येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडेकर, अ‍ॅड. इमरान चांद खान आणि माजी उपसरपंच उमेश गायकवाड आदींनी पुणे येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर 14 ऑगस्ट 2023 पासून आमरण उपोषण आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

कृषिदुतांकडून चाकोरे गावात शेतीत आधुनिक प्रयोग

संबंधित बांधकामात ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक यांनी संगणमताने भ्रष्टाचार केला असून त्यांचावर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच संबंधितांवर दप्तर दिरंगाई अंतर्गत गुन्हे दाखल करावेत या आणि इतर कारणांसाठी हे आंदोलन सुरु असल्याचे मत संदीप गाडेकर, अ‍ॅड. इमरान खान आणि उमेश गायकवाड यांनी भारतीय नायक च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

One Comment on “चोपडजमधील कथित भ्रष्टाचार विरोधात पुण्यात आंदोलन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *