एमएचटी सीईटी 2025 परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र सीईटी सेलने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी सीईटी) 2025 च्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा 16 मार्च ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र सीईटी सेलने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे एमएचटी सीईटी 2025 परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सीईटी सेलच्या cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हे वेळापत्रक संभाव्य असून, आवश्यक असल्यास त्यामध्ये सीईटी सेल बदल करू शकते.

https://x.com/Mpsc_Andolan/status/1862132691447021918?t=-e6VrR9s7cnoZUIaHTN1ng&s=19



पहा सर्व परीक्षांच्या तारखा

1) एम.एड-सीईटी परीक्षा – 16 मार्च 2025
2) एम.पी.एड-सीईटी परीक्षा – 16 मार्च 2025
3) एमबीए/एमएमएस-सीईटी परीक्षा – 17, 18 आणि 19 मार्च 2025
4) एलएलबी-3 वर्ष-सीईटी परीक्षा – 20 आणि 21 मार्च 2025
5) एमसीए सीईटी परीक्षा – 23 मार्च 2025
6) बी.एड (सामान्य आणि विशेष) आणि बी.एड ईएलसीटी-सीईटी परीक्षा – 24, 25 आणि 26 मार्च 2025
7) बी.पी.एड-सीईटी परीक्षा – 27 मार्च 2025
8) एम.एचएमसीटी सीईटी परीक्षा – 27 मार्च 2025
9) बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी इंटीग्रेटेड सीईटी परीक्षा – 28 मार्च 2025
10) बीए-बीएड/बीएससी.बी-एड (चार वर्षीय इंटीग्रेटेड अभ्यासक्रम) सीईटी परीक्षा – 28 मार्च 2025



11) बी.एड-एम.एड (तीन वर्षीय इंटीग्रेटेड पाठ्यक्रम) सीईटी परीक्षा – 28 मार्च 2025
12) बी.डिझाईन सीईटी परीक्षा – 29 मार्च 2025
13) बी.बीबीए/बीसीए/बीबीएम/बीएमएस सीईटी परीक्षा – 01, 02 आणि 03 एप्रिल 2025
14) एलएलबी-5 वर्ष-सीईटी परीक्षा – 04 एप्रिल 2025
15) एएसी सीईटी परीक्षा – 5 एप्रिल 2025
16) नर्सिंग सीईटी परीक्षा – 07 आणि 08 एप्रिल 2025
17) डीपीएन/पीएचएन सीईटी परीक्षा – 08 एप्रिल 2025
18) एमएचटी सीईटी (पीसीबी ग्रुप) परीक्षा – 09 ते 17 एप्रिल 2025 (10 आणि 14 एप्रिल सोडून)
19) एमएनटी सीईटी (पीसीएम ग्रुप) परीक्षा – 19 ते 27 एप्रिल 2025 (24 एप्रिल सोडून)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *