बारामती, 22 जूनः बारामती शहर आणि परिसरात खासगी वसुली एजेंट गुंडांची सर्वसामान्यांवर दहशत दिवसेंदिवस वाढ चालली आहे. ‘बँकेचे हप्त थकले आहेत, जागेवर तोडपाणी करीता दोन- चार हजार रुपये द्या, अन्यथा तुमचे वाहन जप्त करतो’, अशी धमकी वजा वसुलीच सध्या बारामती शहर परिसरात होताना दिसत आहे. मात्र सामान्य व्यक्ती हा बँकेचे हप्ते थकलेत, म्हणून शब्दही न बोलता एकतरी पैशांना बळी पडतो अथवा पै- पै जोडून घेतलेल्या वाहन गमवून बसतो.
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानंतर बानप ने घेतली स्वच्छतेची जबाबदारी
बारामती शहरासह परिसरात सुरु असलेल्या खासगी वसुली एजेंट गुंडांची वसुली ही पुर्णतः बेकायदेशीर असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दयावान दामोदरे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले.
खासगी वसुली एजेंट गुंड एखाद्या कोणाची दुचाकी अथवा चारचाकी गाडी घेऊन गेली असेल किंवा तडजोडच्या नावाखाली पैसे घेतले असतील तर सदर घटनेबाबत स्थानिक पोलिसांकडे जाऊन खंडणी आणि वाहन चोरीचा गुन्हा दाखल करा, असे आवाहनही दयावान दामोदरे यांनी केले आहे.
संत सोपान काका महाराज पालखीचे कोऱ्हाळे गावात भक्तीमय वातावरणात स्वागत
कर्जदाराच्या विना परवानगी अथवा कर्जदाराला दमदाटी करुन वसुली एजेंट गुंडांकडून असे घडले तर कर्जदार वसुली एजेंट विरोधात कायदेशिर गुन्हा दाखल करु शकतो. तसेच या संदर्भात कोणत्याही सल्ल्याची मदत हवी असेल तर संपर्क करण्याचे आवाहनही दयावान दामोदरे यांनी केले आहे.
2 Comments on “खासगी वसुली एजेंट गुंडांचा बारामतीत सुळसुळाट; सर्वसामान्यांना लुबडण्याचे वाढले धंदे!”