पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर!

सोलापूर, 18 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (दि.19 नोव्हेंबर) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. तसेच यावेळी पंतप्रधान देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी 10:45 वाजता सोलापुरात दाखल होणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापुरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

https://twitter.com/PIBMumbai/status/1747855191876178204?s=19

पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूरात 2 हजार कोटींच्या आठ प्रकल्पांची पायाभरणी

यावेळी सोलापूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 हजार कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत पूर्ण झालेल्या सोलापूरमधील रायनगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचे लोकार्पण करणार आहेत. ज्यांच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, विडी कामगार, चालक आणि इतरांचा समावेश आहे.

पीएम स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांना हत्यांचे वाटप

त्यानंतर पंतप्रधान उद्या सोलापूरात एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील पीएम स्वानिधी योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण सुरू करणार आहेत. दरम्यान, पीएम स्वानिधी या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना वा छोट्या विक्रेत्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते. तर या योजनेतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने हे कर्ज मिळते. या कर्जाची नियमित परतफेड केल्यास त्या लाभार्थ्यांना व्याजावर 7 टक्के अनुदान मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *