सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी नोदलाच्या वतीने जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दले यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
https://twitter.com/PIB_India/status/1730906466335473924?s=19
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. यावेळी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारसाला नौदलाच्या वतीने आदरांजली वाहिली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील अरबी समुद्रातील एका बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये राजकोट किल्ल्याची पायाभरणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी 4:15 वाजता सिंधुदूर्ग येथे पोहोचतील. सिंधुदुर्गात पोहोचल्यावर पंतप्रधान राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर ते नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या वतीने जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांचे ऑपरेशनल प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
भारत बनला सर्वाधिक विजय मिळवणारा संघ!
दरवर्षी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांकडून ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही प्रात्यक्षिके नागरिकांमध्ये सागरी चेतना जागृत करते. तसेच या प्रात्यक्षिकांमुळे लोकांना भारतीय नौदलाद्वारे चालवल्या जाणार्या बहु-डोमेन ऑपरेशन्सचे विविध पैलू पाहण्याची संधी मिळते. ही प्रात्यक्षिके राष्ट्रीय सुरक्षेसाठी नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते. असे पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
2 Comments on “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर!”