अयोध्या, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते सध्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे येथील उज्ज्वला योजनेच्या एका लाभार्थी अशा गरीब कुटुंबाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी उज्वला योजनेच्या लाभार्थी असलेल्या मीरा मांझी नावाच्या महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मीरा यांच्या घरी चहा देखील घेतला. याठिकाणी पंतप्रधानांसोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.
https://twitter.com/ANI/status/1741000308233543702?s=19
दरम्यान, देशाचे पंतप्रधान आमच्या घरी येणार आहेत, ते आम्हाला माहीत नव्हते, असे मीराने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे त्यांच्या घरी पोहोचले. हे पाहून या परिसरातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काही मुलांसोबत सेल्फी काढला आणि त्यांना ऑटोग्राफ देखील दिला.
https://twitter.com/ANI/status/1741021784143720594?s=19
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी मीराच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकडून योजनेच्या फायद्यांबाबत माहिती घेतली. ‘मला या योजनेतून मोफत गॅस आणि राहण्याची सोय मिळाली आहे. पूर्वी माझ्याकडे कच्चे घर होते. आता आवास योजनेंतर्गत मला चांगले घर मिळाले आहे. आपण घरी आल्याने खूप आनंद झाला, असे यावेळी मीराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी थंडीत चहा प्यायचा असतो, असे म्हणत या महिलेला चहा बनवायला सांगितले.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या महिलेने बनवलेला चहा प्यायला. चहा थोडा गोड झाला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी या महिलेला म्हटले. यावेळी मोदींनी मीराच्या कुटुंबीयांशी 10-15 मिनिटे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घरी आल्यामुळे खूप आनंद झाल्याचे मीराने म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या घरी येतील, ते आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते, असे मीराच्या पतीने म्हटले आहे.