पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी किल्ल्यात सुरू असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्रीे एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला अभिवादन केले. दरम्यान, दरवर्षी आजच्या दिवशी नौदल दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सिंधुदुर्ग येथे आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या वतीने जहाजे, विमाने आणि विशेष दलांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर नरेंद्र मोदी हे नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. भारतीय नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल. तसेच नौदलाच्या पदांना भारतीय परंपरेनुसार नाव देणार असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

 

“नौदल कुटुंबातील सर्व सदस्यांना माझ्या शुभेच्छा. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नौदल दिनाच्या शुभेच्छा देण्याचे भाग्य मला लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्राच्या सामर्थ्याचे महत्त्व माहित होते. शिवाजी महाराजांना हे माहित होते की, जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो तो सर्वात शक्तिशाली ठरतो.” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. “मला घोषित करताना अभिमान वाटतो की, भारतीय नौदलातील पदांचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण केले जाईल. आम्ही यावर देखील काम करत आहोत. आमच्या संरक्षण दलात महिलांची शक्ती वाढत आहे. नौदलाच्या जहाजावर देशातील पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती केल्याबद्दल मी नौदलाचे अभिनंदन करू इच्छितो.” असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्राने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने भारताने गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा असेल. तसेच आता नौदलाच्या पदाला भारतीय संस्कृतीनुसार नावे देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी नौदलाचा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडता आला हे माझे भाग्य समजतो,” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पुण्यात जिवंत ग्रेनेड सापडले

निराशावादाच्या राजकारणाचा पराभव करून, जनतेने प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची शपथ घेतली आहे. हे व्रत आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल. हे व्रत भारताचा इतिहास हा केवळ हजारो वर्षांच्या गुलामगिरीचा, पराभवाचा आणि निराशेचा नाही तर, भारताचा इतिहास हा विजय, शौर्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि आपल्या नौदल कौशल्याचा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

One Comment on “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *