पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन

दिल्ली, 11 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एबंडेंस इन मिलेट्स’ हे गाणे लिहिले आहे. त्यांच्या या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळाले आहे. बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या श्रेणीमध्ये ह्या गाण्याला नामांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रॅमी अवॉर्ड्सच्या इतिहासात जगातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या एखाद्या राजकीय व्यक्तीला नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर हे गाणे भारतातील धान्य शेतीवर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणे अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह आणि तिचा पती गायक आणि संगीतकार गौरव शाह यांच्या मदतीने लिहिले आहे. तर हे गाणे या दोघांनीच गायले आहे.

दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस

एबंडेंस इन मिलेट्स या गाण्यामध्ये बाजरीची लागवड आणि त्याचे धान्य म्हणून होणारे फायदे यासंदर्भात सांगण्यात आले आहे. तर हे गाणे काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाले होते. त्यावेळी फाल्गुनी शाह हिने याबाबत एक ट्विट केले होते. “आमचे एबंडेंस इन मिलेट्स हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे भारताच्या पंतप्रधानांसोबत मिळून लिहिण्यात आले आहे. हे गाणे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करण्यासाठी तयार केले आहे. तसेच यामध्ये शेतकऱ्यांना बाजरी पिकवण्याचा संदेश देण्यात आला आहे, जेणेकरून जगातून भूक दूर होईल.” असे तिने या ट्विटमध्ये म्हटले होते.

महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड

दरम्यान या गाण्याला आपला आवाज देणारी गायिका फाल्गुनी शाह हिने 2022 मध्ये ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे. त्यावेळी तिला ए कलरफुल वर्ल्ड या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम श्रेणीत पुरस्कार मिळाला मिळाला होता. दरम्यान, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात यावे, यासाठी भारत देशाने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत या प्रस्तावाला जगातील 72 देशांनी पाठिंबा दिला होता.

3 Comments on “पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *