कन्याकुमारी, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगता झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉक मेमोरियल या ध्यानधारणा केंद्रात काल संध्याकाळपासून 45 तासांचे मौन आणि ध्यानधारणा करण्यासाठी बसले आहेत. मोदींनी काल सायंकाळी सुमारे 6.45 वाजता ध्यानाला सुरूवात केली आहे. ज्या खडकावर विवेकानंदांनी ध्यान केले होते, त्याच खडकावर बसून पंतप्रधान मोदी ध्यान करत आहेत. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नारळ पाणी, द्राक्षाचा रस आणि इतर द्रव पदार्थांचे सेवन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, विवेकानंद रॉक मेमोरियल येथे मोठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1796176954107810273?s=19
https://twitter.com/ANI/status/1796378520299753920?s=19
https://twitter.com/ANI/status/1796159510069092451?s=19
उद्या सायंकाळपर्यंत ध्यानस्थ बसणार
नरेंद्र मोदी यांनी ध्यानाला सुरूवात करण्यापूर्वी किनाऱ्यावर असलेल्या भगवती अम्मान मंदिरात नमस्कार केला. भगवती अम्मान मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. यावेळी पुजाऱ्यांनी एक विशेष आरती केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींना मंदिराचा प्रसाद देण्यात आला. याप्रसंगी, मंदिराच्या पुजाऱ्यांनी एक शाल आणि मंदिराच्या देवतेचे फ्रेम देऊन पंतप्रधानांचा सत्कार केला. त्यानंतर नरेंद्र मोदी हे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोहोचले आणि त्यांनी याठिकाणी 6.45 वाजता ध्यानाला सुरूवात केली. नरेंद्र मोदी याठिकाणी 1 जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यानस्थ राहतील.
https://twitter.com/ANI/status/1796393810140049542?s=19
ध्यानाचा आज दुसरा दिवस
नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाचा आज दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदींच्या ध्यानाचा व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे भगव्या वस्त्रात ध्यान करताना दिसत आहेत. तत्पूर्वी, 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील प्रतापगड येथे गेले होते. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पंतप्रधान मोदी केदारनाथला गेले होते. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथे मौन आणि ध्यानधारणा करण्यासाठी बसले आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. कन्याकुमारी मध्ये सध्या 2 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी तटरक्षक दल आणि नौदलाचे सुरक्षा रक्षक सुरक्षेसाठी तैनात आहेत.