पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या कामगिरी विषयी लोकांकडून मत मागवले

नवी दिल्ली, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या कामकाजावर जनतेकडून अभिप्राय मागवला आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जनतेला या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील जनतेला मोदी सरकारच्या 10 वर्षातील कामगिरी विषयी आपले मत मांडता येणार आहे.

https://x.com/narendramodi/status/1741730650393395241?s=20

“गेल्या 10 वर्षांत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचा अभिप्राय नमो ॲपमधील जन मन सर्वेक्षणाद्वारे थेट मला पाठवा.” असे नरेंद्र मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच त्यांनी या जनमन सर्व्हेची लिंक देखील शेयर केली आहे. दरम्यान, या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेला देशातील अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार कायदा, रोजगार, महिला सक्षमीकरण, देशाची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांचा विकास, देशातील पायाभूत सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर आपले मत नोंदवता येणार आहे.



या जन मन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी लोकांना नमो ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर या सर्वेक्षणात केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामगिरी काही बाबत प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपला अभिप्राय सरकारपर्यंत पोहोचणार आहे. या सर्वेक्षणात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *