लडाख, 26 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) भारतात आज 25 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लडाख येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमध्ये शिंकुनला बोगदा प्रकल्पाच्या सुरूवातीचा पहिला स्फोट घडवून या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केली. दरम्यान, शिंकुनला बोगदा प्रकल्प हा जगातील सर्वात उंच बोगदा असणार आहे. हा 4 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा निमू-पदुम-दारचा रस्त्यावर सुमारे 15 हजार 800 फूट उंचीवर बांधण्यात येत आहे.
https://x.com/ANI/status/1816689187761897539
https://x.com/ANI/status/1816696150331719895?s=19
https://x.com/narendramodi/status/1816721199096844518?s=19
कारगिल विजय दिनाचा इतिहास
कारगिल विजय दिवस हा भारतातील एक महत्त्वाचा दिवस आहे. कारगिल विजय दिवस हा दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कारगिल युद्धाची मे 1999 मध्ये सुरूवात झाली होती. 1999 च्या सुरूवातीला पाकिस्तानी सैन्याने गुप्तपणे नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी कारगिलची उंच शिखरे काबीज केली होती. या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध दीर्घकाळ कठीण युद्ध लढले होते.
यादरम्यान भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी कारगिल शिखरांवर पुन्हा एकदा ताबा मिळवला. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने आत्मसमर्पण केले. तेंव्हा हे युद्ध 26 जुलै 1999 रोजी अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली. या विजयानंतर भारत सरकारने 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून घोषित केला. या दिवशी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या युद्धात अनेक भारतीय जवान शहीद झाले. या जवानांचे सर्वोच्च बलिदान देशासाठी एक उदाहरण बनले.