पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी (दि.26) रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी (दि.27) डॉ. मनमोहन सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना भारतीय राजकारणात शांत, संयमी आणि विद्वत्तापूर्ण नेता म्हणून ओळखले जात होते.

https://x.com/AHindinews/status/1872503537625903605?t=HGCLelNP4u1_mYRT0r72TA&s=19

पंतप्रधान मोदींचे ट्विट

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काल रात्री ट्विट करून श्रद्धांजली वाहिली होती. “भारताने आपल्या एका महान आणि प्रतिष्ठित नेत्याला गमावले आहे, डॉ. मनमोहन सिंग. सामान्य परिस्थितीतून उभारी घेत, ते एक आदरणीय अर्थतज्ज्ञ म्हणून उदयास आले. त्यांनी वित्त मंत्रीसह अनेक महत्त्वाच्या शासकीय पदांवर काम केले आणि आपल्या धोरणांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन छाप सोडली. संसदेमध्ये त्यांचे हस्तक्षेप नेहमीच प्रभावी आणि विचारशील असायचे. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले., असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच डॉ. मनमोहन सिंग जी आणि माझ्यात नेहमीच संवाद होत असे, जेव्हा ते पंतप्रधान होते आणि मी गुजरातचे मुख्यमंत्री होतो. शासकीय विषयांवर आमच्या सखोल चर्चा होत्या. त्यांची शहाणपण आणि नम्रता नेहमीच दिसून येत होती. या शोकदायी वेळेत माझे विचार डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांसोबत आहे. ओम शांती. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास

डॉ. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. मनमोहन सिंग यांचे शिक्षण दिल्ली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. ते अर्थशास्त्राचे तज्ञ होते आणि त्यांना भारताच्या आर्थिक स्थितीला सुधारण्याची ठाम इच्छा होती. मनमोहन सिंग हे 1991 मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी देशात महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा सुरू केल्या, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली. डॉ. मनमोहन सिंग हे त्यानंतर 2004 ते 2017 या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती केली. मनमोहन सिंग यांना त्यांच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात होते. 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीच्या वेळीही त्यांनी भारताला स्थिर ठेवले. त्यांचे योगदान भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते भारताच्या इतिहासात एक आदर्श नेता म्हणून नेहमीच लक्षात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *