पंतप्रधान मोदी वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी

वर्धा, 20 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.20) वर्धा येथील पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्र अमरावती टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच पीएम विश्वकर्मांच्या लाभार्थ्यांना किट वाटप, विश्वकर्मा टपाल तिकीट अनावरण, महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. याप्रसंगी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा कारागिरांच्या प्रदर्शनाला भेट दिली. तसेच त्यांनी यावेळी कारागिरांशी संवाद ही साधला.

https://x.com/ANI/status/1837045052465631724?s=19

https://x.com/ANI/status/1837035441960460677?s=19

पंतप्रधान काय म्हणाले?

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन कारागिरांनी उद्योजक व व्यावसायिक व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “दोनच दिवसांपूर्वी आपण सर्वांनी विश्वकर्मा पूजा साजरी केली होती आणि आज वर्ध्याच्या पवित्र भूमीवर पीएम विश्वकर्मा योजनेचे यश साजरे करत आहोत. हा दिवस सुद्धा विशेष आहे कारण याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यता विरोधातील मोहीम सुरू केली होती. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपण कठोर परिश्रमातून समृद्धी आणि कौशल्याच्या माध्यमातून उत्तम उद्याचा संकल्प केला आहे. आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी बापूंच्या प्रेरणा माध्यम बनतील. याप्रसंगी मी या योजनेशी जोडलेल्या सर्व लोकांचे आणि देशभरातील सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

https://x.com/ANI/status/1837037908555092285?s=19

1400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

पारंपारिक व्यवसायांची उत्पादकता वाढवण्यासाठी 6.5 लाखाहून अधिक विश्वकर्मा लाभार्थ्यांना आधुनिक यंत्रसामग्री आणि टूलकिट प्रदान आले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढले असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. एवढेच नाही तर 3 लाख रुपयांचे कर्ज देणाऱ्या कर्ज या योजनेचे फायदेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षभरात लाभार्थ्यांना 1400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

https://x.com/ANI/status/1837032155861635360?s=19

राज्य सरकारच्या योजनांचा शुभारंभ

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या दोन योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये तरूणांच्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना स्वावलंबी होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनांचा समावेश आहे. तसेच पंतप्रधानांनी यावेळी अमरावती जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या आणि 1 हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या पीएम मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि 10 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://x.com/ANI/status/1837034048037998646?s=19

विविध योजनांचा शुभारंभ

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्टने प्रकाशित केलेल्या विश्वकर्मा योजनेच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा यांच्या 1 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना डिजिटल आयडी कार्ड आणि डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रे देखील जारी केली. याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी 75,000 लाभार्थ्यांना डिजिटल कर्जाचे वितरण केले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या कर्जाचा धनादेश प्रदान करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *