वायनाड, 10 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.10) केरळच्या वायनाड येथील भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. यावेळी त्यांनी पुनचिरीमट्टम, मुंडक्काई आणि चुरलमाला या सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी येथील बचाव कार्याची माहिती घेतली. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
https://x.com/ANI/status/1822175046451822598?s=19
https://x.com/ANI/status/1822213606705963308?s=19
पंतप्रधान मोदी यांनी घेतला आढावा
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 11 वाजता कन्नूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर ते वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने वायनाडला रवाना झाले. यावेळी त्यांनी भूस्खलनग्रस्त भागांचे सर्वेक्षण केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी येथील मदत शिबिराला भेट दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भूस्खलनातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पंतप्रधानांनी वायनाडमधील भूस्खलनात बळी पडलेल्या पीडितांशी संवाद साधला.
https://x.com/ANI/status/1822205783611728215?s=19
400 हून अधिक जणांचा मृत्यू
दरम्यान, केरळच्या वायनाड जिल्ह्यात 30 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. यामध्ये 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. तसेच या भूस्खलनामुळे अनेक घरे, रस्ते यांचे नुकसान झाले आहे. या भूस्खलनात अनेक लोक गाडले गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, कोस्ट गार्ड, अग्निशमन विभाग यांच्याकडून बचावकार्य केले जात आहे. सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.