गुना जिल्ह्यातील बस अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

गुना, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका अपघातात बसला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे झालेला रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या प्रति मी शोक व्यक्त करतो. यासोबतच या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे,” असे पंतप्रधान मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

https://twitter.com/PMOIndia/status/1740266688002625763?s=19

दरम्यान, काल रात्री साडेआठच्या सुमारास गुना जिल्ह्यातील गुना-अरोन रस्त्यावर एका डंपरला ही बस धडकली आणि ती बस पलटी होऊन रस्त्यावर पडली. त्यानंतर या बसला लगेचच आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर यात 17 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गुना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घटना घडल्यानंतर गुना जिल्हा रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्या आणि तेथे उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.

https://twitter.com/DrMohanYadav51/status/1740308935222120607?s=19

https://twitter.com/ani_digital/status/1740322560749793466?s=19

“मी अपघाताची सर्व संभाव्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये दोषी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.” असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोबतच त्यांनी जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *