लम्पी आजारापेक्षा प्रतिबंध बरा

बारामती, 14 सप्टेंबरः कोरोनासारख्या महामारीनंतर आता जनावरांसाठी देखील लम्पी आजाराचे मोठे संकट राज्यामध्ये ओढावले आहे. बारामती तालुक्यात देखील लम्पी रोगाचे जनावरे आढळून आली आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील ढेकळवाडीत 3, उंडवडी कप मध्ये 1, शिर्सुफळमधील साबळेवाडी येथे 5, कोऱ्हाळे बुद्रुक येथे 14, पारवडी येथे 1, लोणी भापकर येथे 3 अशी 24 जनावरे लम्पी रोगाने ग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग बारामती यांच्यामार्फत सदर रोगाच्या आढळून आलेल्या गावांचा पाच किलोमीटर अंतरात जनावरांना लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

बारामतीत शेतकरी कृती समिती आणि पाटबंधारे विभागाची बैठक

शासनाकडून बारामती विभागाला तब्बल 21,000 लस प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये एकूण 11,127 लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच उरलेले लसीकरण येत्या दोन दिवसाच्या आत पूर्ण होईल, असे बारामती तालुक्यातील लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालयचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. एल. त्र्यंबके आणि बारामती पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पाटील यांनी ‘भारतीय नायक’चे वृत्त संपादक सम्राट गायकवाड, कार्यकारी संपादक अभिजीत कांबळे आणि वार्ताहर मोहीम बागवान यांच्याशी बोलताना सांगितले.

लम्पी रोगाचा जनावरांच्या दुधावर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे लोकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी लोकांना सांगितले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे लोकांना आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *