दिल्ली, 23 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये निर्मला सीतारामन यांनी काही उत्पादनांवरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी अर्थमंत्र्यांनी काही उत्पादनांवर कर वाढवला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पानंतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महागणार? याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
कॅन्सरवरील औषधे स्वस्त
केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा आहे. त्यानुसार, कर्करोगावरील Trastuzumab deruxtecan, Osimertinib आणि Durvalumab या औषधांना सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हे तिन्ही औषधे आता स्वस्त होणार आहेत.
एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील आयात शुल्कही हटवण्यात आले. त्यामुळे एक्स-रे उपकरणे स्वस्त झाली आहेत.
https://x.com/ANI/status/1815637867760427246?s=19
मोबाईल उपकरणे स्वस्त
या अर्थसंकल्पात मोबाईल फोन, मोबाईल पीसीबीए आणि मोबाईल चार्जरवरील मूलभूत सीमा शुल्क 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईलच्या किंमती आता कमी होणार आहेत.
https://x.com/ANI/status/1815640825986175075?s=19
25 खनिजांवरील सीमाशुल्कात सूट
अर्थमंत्र्यांनी 25 अत्यावश्यक खनिजांवरील सीमाशुल्कात पूर्णत: सूट देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा अंतराळ, संरक्षण, दूरसंचार, हाय-टेक इलेक्ट्रॉनिक्स, अणुऊर्जा आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांना होईल, जिथे ही दुर्मिळ खनिजे महत्त्वाची आहेत.
अक्षय ऊर्जा क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी देशात सोलर सेल आणि सोलर पॅनेलच्या निर्मितीसाठी वापरासाठी करात सूट देण्यात आली आहे.
मासे होणार स्वस्त
या अर्थसंकल्पात ब्रूडस्टॉक, पॉलीकाइट वर्म्स, कोळंबी आणि माशांच्या खाद्यावरील मूलभूत सीमा शुल्क 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याशिवाय सीफूड निर्यातीला चालना देण्यासाठी कोळंबी आणि माशांच्या खाद्यपदार्थांवरील सीमा शुल्कात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मासे आणि इतर जलचर खाद्यपदार्थ स्वस्त होणार आहेत.
लेदर आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त
अर्थमंत्र्यांनी लेदर आणि टेक्सटाईल क्षेत्रातील निर्यातीची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी विविध चामड्याच्या कच्च्या मालाच्या सीमा शुल्कात सूट जाहीर केली आहे. त्यामुळे लेदर आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. तसेच चप्पल, बुट हे देखील स्वस्त होणार आहेत.
https://x.com/ANI/status/1815638728070889841?s=19
सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त
याशिवाय देशातील सोने आणि मौल्यवान धातूच्या दागिन्यांवरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यानुसार, सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के, तर प्लॅटिनमवरील 15.4 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. अशा स्थितीत सोने-चांदीचे भाव खाली येतील.
कोणत्या वस्तू महागणार?
या अर्थसंकल्पात पीव्हीसी फ्लेक्स बॅनर आयात करणे महाग होईल. तसेच दूरसंचार उपकरणावरील सीमा शुल्कात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे दूरसंचार उपकरणे महागली आहेत. प्लास्टिकच्या वस्तूंवर आयात शुल्क वाढले असल्याने प्लॅस्टिकच्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत. याशिवाय सुपारी, सिगारेट, प्रयोगशाळा रसायने या वस्तू देखील महाग झाल्या आहेत. तसेच विमान प्रवास ही महागला आहे.