बारामती, 16 जूनः बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2022 होऊ घातली आहे. राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवक आणि नगरसेविकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. पक्षाचे तिकीट मिळणार नसल्याची खात्री अनेकांना पटलेली आहे. अनेक कार्यकर्ते पक्षावर दबाव आणण्यासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत कामाला लागले आहेत.
यंदा नगर परिषदेत 41 पैकी 21 उमेदवार या महिला असल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. नवीन प्रभागांचा शोध घेण्याची कामे अनेकांनी चालू केली आहे. नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे निष्ठावंत यावेळेस इच्छुक असल्याने बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सातव, गुजर, ढोले गटाची बांधणी चालू झाली आहे. शह-कटाचे राजकारण सुरू झाले आहे. दोन-दोन, तीन-तीन टर्म नगरसेवक असणारे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. आजही उदरनिर्वाहाचे साधन नाही, तर काही नगरसेवक कुटुंबीय वाममार्गाने लक्षाधीश झाले आहेत. त्यामुळे निष्ठेने काम करणाऱ्या नगरसेवक कुटुंबीय पक्षावर नाराज आहे. व्यापारी राजकारणी कुटुंबीय गबरगंड चालली आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चालू झाली आहे.