मुंबई, 21 फेब्रुवारीः बेकायदेशीर भंगार व्यवसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रबुद्ध युवक संघटनेकडून मुंबई येथील आझाद मैदान येथे आज, मंगळवारी 21 फेब्रुवारी 2023 पासून आमरण उपोषण सुरू आहे. बेकायदेशीर भंगार व्यावसायिकांवर अद्याप कोणतेही कारवाई झाली नसल्याने हे आमरण उपोषण सुरू असल्याचे सांगितले आहे.
राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुल खंडूखैरेवाडी येथे शिवजयंती साजरी
दरम्यान, पोलीस महासंचालक यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे प्रबुद्ध युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष अभिजित कांबळे, सचिव गणेश जाधव, आशिष भोसले, शुभम कांबळे, ओंकार माने यांनी सांगितले आहे.
भंगार व्यावसायिक यांच्या विरोधात चाललेल्या आंदोलनास विविध पक्ष व संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती ‘भारतीय नायक’च्या प्रतिनिधीशी बोलताना प्रबुद्ध युवक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड यांनी सांगितले आहे.
One Comment on “बेकायदेशीर भंगार व्यवसायिकांवर कारवाईसाठी प्रबुद्ध संघटनेचे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू”