बारामती मधील वीजपुरवठा गुरूवारी बंद राहील, या वेळेत लाईट जाणार!

बारामती, 31 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील वीजपुरवठा गुरूवारी (दि. 01 ऑगस्ट) देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. बारामती शहरातील ईएचव्ही उपकेंद्रामधील सर्व फिडरचा वीजपुरवठा गुरूवारी सकाळी 9:00 ते दुपारी 01:00 या कालावधीत बंद राहणार आहे. देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी हा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. याबाबतची माहिती माहिती महावितरणने दिली आहे.

वीज कंपनीची माहिती

220 केव्ही बारामती ईएचव्ही सबस्टेशनमध्ये उद्या अत्यंत महत्त्वाची तांत्रिक देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ईएचव्ही उपकेंद्रामधुन महत्वाच्या तांत्रिक कामासाठी 33 के.व्ही च्या Urban फिडरवर शट डाऊन असल्याने उद्या सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बारामती शहरातील वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. दरम्यान, हे काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल. तसेच ते काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पुर्ववत होऊ शकतो, असेही महावितरण कंपनीने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *