बारामती, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील वीजपुरवठा गुरूवारी देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद राहणार आहे. बारामती शहरातील ईएचव्ही उपकेंद्रामधील सर्व फिडरचा वीजपुरवठा गुरूवारी (दि.11 जुलै) सकाळी 9:00 ते दुपारी 01:00 या कालावधीत बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. याबाबतची माहिती माहिती महावितरणने दिली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
220/33 केव्ही बारामती ईएचव्ही सबस्टेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्या सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बारामती शहरात वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. दरम्यान, हे काम नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल. तसेच ते नियोजित वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा पुर्ववत होऊ शकतो, असेही महावितरण कंपनीने सांगितले आहे.