बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात उद्या 20 मे 2022 पासून एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), एम.व्होक., बी.लिब.,एम.लिब, व डी.टी.एल. या वर्गाच्या लेखी परीक्षा सुरु होणार होत्या. मात्र सदर परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या 27 एप्रिल 2020 च्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नियमानुसार घेण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन पत्रकार संजय दराडे, पत्रकार साजन अडसुळ, सचिन मोरे यांच्या वतीने आज, गुरुवार 19 मे 2022 रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य जगताप सरांना दिले.
सदर निवेदन पत्राची दखल घेत आज, 19 मे रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने सदर पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलत 1 जून 2022 पासुन सुरु होणार असल्याची नोटीस काढल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याचा आणखीन वेळ मिळाला आहे.