बारामती, 23 ऑक्टोबरः बारामती शहरातील बाजारपेठेत दिवाळी सणासुधीमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे शहरातील सम विषम पार्किंग व्यवस्थेला काही कालावधीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय शहर पोलीस स्टेशनकडून घेण्यात आला आहे. या काळात वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
बारामतीत सम-विषम पार्किंगला स्थगिती
तसेच पुढील 15 दिवस बारामती शहरातील भिगवण चौक ते गांधी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. याशिवाय गुणव चौक ते गांधी चौक व तेथून कदम चौक या मार्गावरही एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. गांधी चौकाकडून भिगवण चौकाकडे व गुणवडी चौकाकडे कोणतीही दुचाकी, चारचाकी सोडली जाणार नाही. मात्र बारामती शहर पोलीस स्टेशनने केलेल्या नियोजनावर आजच प्रश्नचिन्ह उभे करणारा व्हिडीओ ‘भारतीय नायक’ ने समोर आणला आहे.
बारामती शहरातील तीन हत्ती चौक येथील पुलाचे काम सुरुच आहे. मात्र पदचाऱ्यांसाठी लहान पुल खुला केला आहे. सदर पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहन जाऊ नये, याकरीता नाट्यगृहाजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. मात्र शहर पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे या पुलावरून आज, 23 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी दुचाकी आणि चारचाकीची वाहतूक होताना समोर आली.
पोलिसांच्या या ढिसाळ नियोजनामुळे तीन हत्ती चौकात तसेच भिगवण रोड ते गुल पुनावाला गार्ड कडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. याकडे बारामती शहर पोलिसांकडून अक्षरशः दुर्लक्ष होताना दिसत आहे.
One Comment on “बारामती शहरात पोलिसांचं ढिसाळ वाहतूक नियोजन”