पुणे, 25 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी अजित पवारांनी तेथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना ही कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांना राजकीय डेंग्यू झाल्याची टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी यावेळी प्रत्यूत्तर दिले आहे.
डीपफेक प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती होणार
“मी गेले 15 दिवस डेंग्यूने आजारी होतो. मी राजकीय डेंग्यूने त्रस्त आहे, अशा बातम्यांनी मी व्यथित झालो आहे. राजकीय डेंग्यू माझ्या स्वभावात आणि रक्तामध्ये नाही. मी गेल्या 32 वर्षांपासून माझी मते स्पष्टपणे मांडत आहे. तसेच मी अमित शाह यांची भेट घेतली नाही आणि त्यांच्याकडे कसलीही तक्रार केलेली नाही.” असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अजित पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार प्रत्येकाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. प्रत्येकाने राज्याची कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. सामान्य नागरिक असो वा सरकारी प्रतिनिधी त्यांनी भडकाऊ भाषण देऊ नये. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल, अशी विधाने कोणी करू नयेत. असे ते यावेळी म्हणाले.
चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क
तसेच राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली. राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 31 जुलैपर्यंत शेतीसाठी पाण्याची बचत कशी करता येईल? यासंदर्भात त्या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय, ह्या बैठकीत गुरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
One Comment on “राजकीय डेंग्यू माझ्या स्वभावात आणि रक्तामध्ये नाही – अजित पवार”