बारामती, 14 ऑगस्टः बारामती शहरातील तीन हत्ती चौकात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दौडचे आयोजन करण्यात आले होते. सदर दौडचे आयोजन आज, 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते.
प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
या दौडमध्ये पोलिसांसह पत्रकार बंधू आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला. दौड पूर्ण झाल्यानंतर तीन हत्ती चौकात देशभक्तीपर गाण्यावर पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बंधवांनी डान्स केला. यावेळी डान्स पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. सध्या पोलीस आणि पत्रकारांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.