बारामतीमधील बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची कारवाई

बारामती, 22 नोव्हेंबरः बारामती शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चाललेली आहे. रस्ते मोठे होऊन सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या वाढतच आहे. त्यामध्येच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करत असतात. तसेच रिक्षा थांब्यावर व्यवस्थित लाईनमध्ये न थांबता आपापसामध्ये भांडण करून डबल लाईन करून थांबलेले असतात.

शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

तसेच काही ठिकाणी बेकायदा पार्किंग करून वाहनांना अडथळे निर्माण करत असतात. कोणताही रिक्षाचालक हा त्याला नेमून दिलेला गणवेश, बॅच व बिल्ला लावत नाही. आता काही शहरांमध्ये रिक्षा त्यामध्ये सुद्धा युनिफॉर्म नसल्यामुळे तो गुन्हेगार आहे की रिक्षावाला आहे, हे कळत नाही.

महिला अत्याचारासारख्या घटना होत आहेत. त्यामुळे याला आळा बसावा, म्हणून आज, 22 नोव्हेंबर 2022 रोजी बारामती शहरात बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 14 रिक्षा पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही वाहतूक नियमांचे पार्किंगचे वाहिनी फॉर्म न घालण्याचे उल्लंघन केल्यास कारवाई सतत चालू राहणार आहे.

बारामतीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये वाहतूक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव तसेच पोलीस कर्मचारी जाधव, झगडे, चव्हाण, घोळवे, कदम, चालक कांबळे, महिला पोलीस कर्मचारी काळे, साबळे, जामदार आदींनी केली आहे.

2 Comments on “बारामतीमधील बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *