अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

बारामती, 17 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मौजे होळ येथील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छुप्या पद्धतीने अवैधरित्या हातभट्टी दारू वाहतूक करण्यात येत होती. सदर अवैध हातभट्टी दारूची वाहतूक करताना वाडगांव निंबाळकर पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यानंतर पोलिसांनी सकाळी 9.30 च्या सुमारास होळ गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पुलाच्या अलीकडे गावठी हातभट्टीची तयार दारू वाहतूक करताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई करत पकडली.

तब्बल 35 वर्षांनी मिटला रस्त्याचा वाद!

सदर कारवाईत पोलिसांनी होळ गावच्या हद्दीत निरा नदीच्या पुलाजवळ महिंद्रा कंपनीची लाल रंगाची स्कॉर्पिओ (एम. एच. 12. सी.डी. 5550) ची तपासली. या गाडीमध्ये 35 लिटरच्या मापाची काळे, निळे, पिवळे रंगाची 18 कॅन्ड गाडीसह एकूण 4 लाख 63 हजार रुपये किमतीचा माल पकडण्यात आला.

या कारवाईत संशयित आरोपी चेतन जाधव (वय 22) दिनेश आडके (वय 23), संदीप चौगुले (वय 21, सर्व रा. माळेगाव ता. बारामती) आदींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) 83 प्रमाणे फिर्यादी दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा पुढील तपास पोलीस नाईक देवकर हे करीत आहेत.

रद्दी विक्रीसंदर्भात खरेदीदारांना आवाहन

One Comment on “अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *