क्रिकेटपटू मयंक अग्रवालच्या पाण्यात विष? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

त्रिपुरा, 31 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याच्या संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. मयंक अग्रवाल विमानातून प्रवास करीत होता. त्यावेळी त्याच्या सीटच्या पाऊच मध्ये एक बाटली होती. मयंकने त्या बाटलीत असलेले द्रव्य पाणी समजून पिले. त्यानंतर तो आजारी पडला. त्याच्या तोंडात आणि घशात जळजळ होऊ लागली. त्यानंतर मयंक अग्रवालला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या ठीक असून तो धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी मयंकने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्या विरोधात कोणीतरी कट रचल्याचा आरोप त्याने केला आहे. सध्या त्याचा पोलीस तपास करीत आहे.

https://x.com/PTI_News/status/1752359617211023414?s=20

https://x.com/PTI_News/status/1752359891615047989?s=20

पाणी समजून दुसरेच काहीतरी प्यायले

मयंक अग्रवाल याला विष दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मयंक संघाच्या पुढील सामन्यासाठी दिल्लीमार्गे सुरतला जाणाऱ्या विमानात बसला होता. त्यावेळी विमानात त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने पाणी समजून एक पेय प्यायले. ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला. त्यानंतर मयंकने त्याच्या मॅनेजरमार्फत त्रिपुरा पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. तर याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी दिली. मयंक अग्रवालला आज आगरतळा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

https://twitter.com/mayankcricket/status/1752602780207083677?s=19

मयंक पुढील सामन्यात खेळणार नाही

मयंक अग्रवाल सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. कर्नाटकचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात 51 आणि 17 धावा केल्या होत्या. तर मयंक अग्रवाल 2 फेब्रुवारीपासून सुरत येथे सुरू होणाऱ्या कर्नाटकच्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मयंकने भारतासाठी आतापर्यंत 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या 36 डावांमध्ये 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. सध्या तो भारतीय संघाच्या बाहेर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *