मोरगावपर्यंत पीएमटी बस सेवा पुन्हा सुरू

बारामती, 4 ऑगस्टः बारामती तालुक्यातील मोरगाव येथे हडपसर ते मोरगाव पीएमटी बससेवा बंद करण्यात आली होती. बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, त्यामुळे भाविकांसह या ठिकाणी विद्यार्थी, शेतकरी, नोकरवर्ग, महिला व्यावसायिक यांना बसचा उपयोग होत होता.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

दरम्यान, सदर हडपसर ते मोरगाव ही बस सेवा बंद करण्यात आली. यानंतर प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर पुन्हा बस सुरू केल्याची माहिती मोरगावच्या ग्रामस्थांनी दिली. बसच्या मोरगावला सकाळी 4.50 वाजता, 9.05 वाजता, दुपारी 3 वाजता आणि रात्री 8.50 वाजता येते. मोरगाव येथून जाणारी बस सकाळी 6.30 वाजता, 11.10 वाजता, सायंकाळी 5.00 वाजता आणि रात्री 9.40 वाजता सुटते.

हडपसर- मोरगाव ही पीएमटीची बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पीएमटीचे महानगरपालिका आयुक्त आणि मोरगावचे सुपुत्र संदीप कदम यांना ग्रामस्थांनी सेवा सुरू करण्याबाबत वारंवार मागणी केली होती. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पीएमटीची बससेवा सुरू केली. ही बससेवा कायमस्वरूपी राहावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *