पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली

लेपचा, 12 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. देशातील सैनिकांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ते सैनिकांसोबत दिवाळी साजरी करायचे. तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून ते दरवर्षी दिवाळी सण देशाच्या सैनिकांसोबत साजरा करतात.

वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील सैनिकांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यावेळी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, “आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो. हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे हा एक खोल भावना आणि अभिमानाने भरलेला अनुभव आहे. ते आपल्या कुटुंबापासून दूर, आपल्या राष्ट्राचे हे रक्षक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. आपल्या सुरक्षा दलांचे धैर्य अतूट आहे. सर्वात कठीण प्रदेशात, त्यांच्या प्रियजनांपासून दूर, त्यांचे त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवतात. शौर्य आणि लवचिकतेचे परिपूर्ण अवतार असलेल्या या वीरांचे भारत सदैव ऋणी राहील.”

दरम्यान, 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सियाचीन ग्लेशियरवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2015 साली त्यांनी पंजाबमधील अमृतसर येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर 2016 मध्ये पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये सैनिकांच्या सोबत दिवाळी साजरी केली होती. 2017 मध्ये पंतप्रधानांनी काश्मीरमधील गुरेझमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2019 मध्ये जम्मू येथील राजौरीमध्ये लष्करी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी 2020 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी राजौरी जिल्ह्यातील नौशहरा येथील सैनिकांसोबत दिवाळी सण साजरा केला होता. तर गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.

यंदा मी दिवाळी साजरी करणार नाही – जरांगे पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *