बारामती, 11 ऑक्टोबरः बारामतीमधील शारदा नगर येथील शारदाबाई पवार निकेतन डे स्कूल येथे बारामती तालुक्यातील तालुका अंतर्गत मैदानी शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन तालुका क्रीडा विभागाने आयोजित केले आहे. हे आयोजन तालुक्यातील विद्यार्थ्यांना खेळात नैपुन्य मिळावे व विद्यार्थी खेळ क्षेत्रात जिल्हा, राज्य आणि राष्ट्र पातळीवर खेळावेत, या हेतूने विद्यार्थ्यांना घेतले जातात. यासाठी शाळेत व तालुकास्तरावर निधी वर्ग केला जातो. परंतु, बारामतीच्या शारदा नगर येथील क्रीडांगणासह परिसरात बसण्याची आणि पाण्याची सोयदेखील केली गेली नाही. तसेच येणारे शालेय संघ आस्थावेस्थ रस्त्याने फिरताना दिसत आहेत. तर विद्यार्थ्यांची वाहतुक ही खाजगी मालवाहतुक करणाऱ्या गाडीतून होत आहे.
बारामतीमधील डॉक्टरांचे आरोग्य बिघडले!
जनावरणांप्रमाणे विद्यार्थी बनून शारदा नगर येथे आणण्यात येत आहे व पुन्हा त्यांची त्याच गाडीतून घराकडे वाहतुक होत आहे. हा जीव घेणा प्रवास करत असताना अनेक विद्यार्थी हे जखमी होत आहेत. सदर माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना परवानगी नसताना प्रवासी वाहतुक केली जात आहे. यात एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे.
आमराई विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा!
शिक्षक व मुख्याध्यापक किंवा क्रीडा शिक्षक हे आपापल्या वाहनातून सुरक्षित क्रीडा स्थळी येत आहेत. परंतु, सर्वसामान्य विद्यार्थी हे माल वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जनावरांसारखी कोंबून ने- आण केली जात आहे. फी व्यतिरिक्त घेतल्या जाणाऱ्या रक्कमा व क्रीडासाठी असणारा अनुदान हे नेमके जाते कुठे? हाच पालकांचा प्रश्न आहे.
One Comment on “तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!”