बारामती, 19 ऑक्टोबरः बारामतीचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बारामतीमधील तांदूळवाडी येथील फॉरेस्टच्या जागेवर तब्बल 1000 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बारामती नगर परिषदेची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीने 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता केक कापुन वाढदिवस साजरा केला. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.
पोलीस प्रशासनाचे बारामतीकरांना आवाहन
यावेळी फॉरेस्ट अधिकारी गोलांडे, फॉरेस्ट अधिकारी मोरे, राष्ट्रवादी अपंग सेल अध्यक्ष जाधव, राष्ट्रवादी महीला संघटक नलीनी पवार, जगताप मॅडम, दत्तात्रय जाधव, मोहीनी जाधव, उद्यान विभाग प्रमुख विजय शितोळे, मस्जिद पठाण पत्रकार, गणेश जाधव, प्रविण बोरा, बंडा मोरे, सलिम शेख, अमर आवघडे, विजय मोहीते, विनोद गुळवे, बाबा कांबळे पत्रकार, पप्पु शितोळे, सुरेश झगडे आदी उपस्थित होते.
One Comment on “राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तब्बल 1000 झाडांचे वृक्षारोपण”