नेपाळमध्ये विमान कोसळले, 18 प्रवाशांचा दुदैवी मृत्यू

काठमांडू, 24 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळच्या काठमांडू येथे एका विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी उड्डाण घेत असताना हे विमान कोसळले. त्यानंतर या विमानाला आग लागली. दुर्दैवाने या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये एक जण जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://x.com/AHindinews/status/1816000947132223628?s=19

https://x.com/AHindinews/status/1816017832523497473?s=19

विमानात एकूण 19 प्रवासी होते

या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली. तसेच त्यांनी याठिकाणी बचावकार्य सुरू करून एका व्यक्तीचे प्राण वाचवले. या जखमी व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ह्या अपघातावेळी विमानात 19 प्रवासी होते. त्यापैकी 18 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले

दरम्यान, हे अपघातग्रस्त विमान (CRJ7 Reg-9NAME) सूर्या एअरलाईन्सचे असून ते विमान 19 प्रवाशांसह काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखराला जाणार होते. या विमानाने काठमांडूहून पोखरासाठी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:11 वाजता उड्डाण केले. परंतु काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान खाली कोसळले. त्यानंतर या विमानाला आग लागली. या अपघातानंतर संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता. विमानाला आग लागल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते. या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *