नागपूरात पेन्शन जन क्रांती महामोर्चा; महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आंदोलकांची भेट

मुंबई, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे आज पेन्शन जन क्रांती महामोर्चा काढला. या मोर्चात लाखोंच्या संख्येने राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात 2005 नंतर नोकरीत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन 1982 च्या आदेशानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज नागपूर येथील यशवंत स्टेडीयमवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून पेन्शन जन क्रांती महामोर्चा काढण्यात आला.

https://twitter.com/VinayakChauthe/status/1734595679677497557?s=19

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच ह्या नेत्यांनी यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “तर येणारं सरकार आपलं आहे आणि आम्ही जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू करू! खोके सरकार स्वतःला खोके आणि जनतेला धोके देत आहे, ह्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी?” असे त्यांनी यावेळी म्हटले.

https://twitter.com/AUThackeray/status/1734510403575783803?s=19



यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकार येतं सरकार जातं, पण हा जो तुमचा विश्वास माझ्यावर, महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या लढ्यामध्ये प्रत्येक पावलावर शिवसेना सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही.” हे सरकार ज्या काही घोषणा करत आलेलं आहे, एक तर ह्याचे सगळे मित्र होते, हजारो-कोटीचा चुना लावून गेले, तेव्हा पैशांचा चुराडा नाही झाला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी मुख्यमंत्री नाहीये, माझा पक्ष चोरलेला आहे, निवडणूक चिन्ह चोरलेलं आहे. मी मुख्यमंत्री असतो तर आज मी निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलेलो आहे. ह्या सरकारच्या थापेबाजीला बळी पडू नका.” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

https://twitter.com/OfficeofUT/status/1734479848679301517?s=19


तसेच “केवळ राज्यसरकारलाच नव्हे, तर केंद्रसरकारला खाली खेचण्याची धमक आणि हिंमत आपल्याला दाखवण्याची वेळ आलेली आहे. हे खोटं राजकारण, गद्दारांचं राजकारण, हे आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रातून खतम करण्याची वेळ आलेली आहे. हा लढा जो तुम्ही सुरू केलाय, तो जिंकल्याशिवाय थांबायचं नाही! निवडणूक जवळ येतेय, हे सरकार तुमच्या कोपराला गुळ लावू शकेल, भुलभुलैय्यामध्ये फसवू शकेल! जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाभावाची लोकं मंत्रीमंडळात पाठवत नाही, तोपर्यंत कितीही आक्रोश करा… हे असंवेदनशीलच राहणार! ही लढाई आता जिंकेपर्यत थांबवायची नाही. कुठेही फसू नका, ह्यांच्या भुलथापांना बळी पडून नका आणि हे तुमच्यावर दुर्लक्ष करतायंत. त्यांना खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसू नका.” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1734528894253085064?s=19

याशिवाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्र शासनाला जुनी पेन्शन योजना सुरू करण्यास भाग पाडू. तसेच काँग्रेस पक्ष आपल्या सोबत असल्याचे म्हटले आहे. “जुनी पेन्शन हा सरकारी कर्मचाऱ्यांचा संविधानिक हक्क असून तो आपणास मिळालाच पाहिजे, ही आमची भावना आहे. काँग्रेस शासित राज्यांमध्ये जुनी पेन्शन सुरु केली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना सुरु करण्यास काही अडचण नाही.राज्य शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली पाहिजे,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *