भवानीनगर कारखान्याच्या वाहतुकीवर दंडात्मक कारवाई

बारामती, 10 नोव्हेंबरः इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना येथील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरवर आज, 10 नोव्हेंबर 2022 रोजी 1 लाख 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आली.

बारामतीत बर्निंग कारचा थरार

भवानीनगर सहकाही साखर कारखाना परिसरात रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या तब्बल 11 वाहनांवर बारामती आरटीओकडून सदर कारवाई करण्यात आली. तसेच भविष्यात अपघात टाळण्यासाठी सदर वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले. यासह संबंधित चालकांचे प्रबोधनही करण्यात आले.

मतदार नोंदणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

यावेळी बारामती मोटार वाहन निरिक्षक हेमंतकुमार सोलणकर, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक हर्षदा खारतोडे, प्रियंका सस्ते, वाहन चालक विठ्ठल गावडे तसेच कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, सचिव काटे हे उपस्थित होते.

One Comment on “भवानीनगर कारखान्याच्या वाहतुकीवर दंडात्मक कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *