बारामती, 19 डिसेंबरः राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 नुसार रविवारी, 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यात बारामती तालुक्यातील तब्बल 13 ग्रामपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अंतर्गत शांततेत मतदान पार पडले. बारामतीच्या तब्बल 13 ग्रामपंचायतीमध्ये 83.66 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजविल्याची माहिती तहसिल कार्यालयाने जाहिर केली आहे.
बारामती तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 36 उमेदवार तर सदस्यपदाच्या 127 जागांसाठी 291 उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीमध्ये बंद झाले आहे. उद्या 20 डिसेंबर (मंगळवार) 2022 रोजी बारामती प्रशासकीय भवनात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामुळे आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे.
बारामतीत तोडफोड करणाऱ्या गँगवर मोक्कांतर्गत कारवाई
बारामती तहसिल कार्यालयाकडून रविवारी पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. यात वाघळवाडी ग्रामपंचायतीत 80.27 टक्के मतदान झाले. यात 3051 पैकी 2449 मतदात्यांनी मतदान केले. यात 1267 पुरुष तर 1182 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर मुरुम ग्रामपंचायतीत 84.99 टक्के मतदान झाले. यात 4444 पैकी 3777 मतदात्यांनी मतदान केले असून 2065 पुरुष आणि 1712 महिला मतदात्यांचा समावेश आहे. काऱ्हाटी ग्रामपंचायतीत 85.70 टक्के मतदान झाले. यात 2999 पैकी 2570 मतदात्यांनी मतदान केले. यात 1353 पुरुष आणि 1217 महिला मतदारांचा समावेश आहे. पळशी ग्रामपंचायतीत 92.22 टक्के मतदान झाले. यात 1606 पैकी 1481 मतदारांनी मतदान केले असून यापैकी 802 पुरुष तर 679 महिला मतदारांचा समावेश आहे.
मासाळवाडीत 91.01 टक्के मतदान झाले. यात 1213 पैकी 1104 मतदारांनी मतदान केले. यात 598 पुरुष तर 506 महिला मतदारांनी मतदान केले. लोणीभापकरमध्ये 83.54 टक्के मतदान झाले. यात 3171 पैकी 2649 मतदारांनी मतदान केले. यात 1396 पुरुष तर 1253 महिला मतदारांनी मतदान केले. मोरगांवमध्ये 85.63 टक्के मतदान झाले. यात 4307 पैकी 3688 मतदारांनी मतदान केले असून यापैकी 1932 पुरुष तर 1756 महिला मतदारांनी मतदान केले. सोरटेवाडीत 79.23 टक्के मतदान झाले. यात 1420 पैकी 1125 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 562 पुरुष तर 563 महिला मतदारांनी मतदान केले. कुरणेवाडीत 92.31 टक्के मतदान झाले. यामध्ये 1379 पैकी 1273 मतदारांनी मतदान केले. यात 648 पुरुष तर 625 महिला मतदारांनी मतदान केले.
नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ
सोनकसवाडीत 92.86 टक्के मतदान झाले. यात 1905 पैकी 1769 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 925 पुरुष तर 844 महिला मतदारांनी मतदान केले. वाणेवाडीत 80.71 टक्के मतदान झाले. यात 4629 पैकी 3736 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 1992 पुरुष तर 1744 महिला मतदारांनी मतदान केले. गरदडवाडीत 90.72 टक्के मतदान झाले. यात 1013 पैकी 919 मतदारांनी मतदान केले. यापैकी 470 पुरुष तर 449 महिला मतदारांनी मतदान केले. पणदरेमध्ये 83.93 टक्के मतदान झाले. यात 5886 पैकी 4902 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात 2602 पुरुष तर 2300 महिला मतदारांनी मतदान केले.
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये एकूण 84.93 टक्के मतदान झाले आहे. यात 37023 पैकी 31442 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. यामध्ये 16612 पुरुष तर 14830 महिला मतदारांनी 18 डिसेंबर रोजी मतदान केले आहे.
One Comment on “बारामतीत शांततेत मतदान; आता लक्ष निकालाकडे!”