बारामतीमधील 23 गावातील सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक संपन्न

बारामती, 27 ऑगस्टः आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या एकूण 23 गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांची शांतता बैठक नुकतीच 25 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आयोजित केलेली होती.

मळदच्या सराईत गुन्हेगाराला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

सदर बैठकीस उपस्थितांना माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी मार्गदर्शन केले. तसेच माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चालू वर्षीपासून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून प्रदूषण विरहित इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्थापना करण्याचे आवाहन केले. यासह गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय क्रीडा स्पर्धा, समाजप्रबोधनात्मक संदेश, देखावा, डी.जे. विरहित पारंपारिक वाद्यांमध्ये विसर्जन मिरवणूक आदी चांगले कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांची परीक्षक मार्फत पडताळणी करून गुणांच्या आधारे 1 ते 5 सर्वोत्कृष्ट मंडळांची निवड केली जाणार आहे.

त्या मंडळांना माळेगाव पोलीस स्टेशन वतीने श्री गणराया सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देवून जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होवून खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्तीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अवचर यांनी केले. तसेच खालील प्रमाणे प्रमुख सूचना दिल्या आहेत.

  • उत्सवासाठी मंडप टाकताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • गणेशोत्सवात धार्मिक- जातीय तेढ निर्माण होईल, अशा आशय किंवा स्वरूपाचे नसावेत.
  • मिरवणुकीमध्ये डी. जे. चा वापर करू नये.
  • गणेशोत्सवामध्ये अनावश्यक खर्च कमी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
  • गणेश मूर्तीच्या संरक्षणासाठी 24 तास स्वयंसेवक नेमावेत.
  • वर्गणीसाठी कोणीही नागरिकांवर तसेच रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांवर जबरदस्ती करणार नाही.
  • गणेश मंडळांनी वीज वितरण कंपनीकडून रीतसर परवानगी घेऊन तात्पुरते कनेक्शन घ्यावे, कोणीही चोरून विजेचा वापर करू नये.
  • सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी पोलीस स्टेशन आणि इतर कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • श्री गणेश आगमन दिवशी मिरवणूक आयोजन करू नये.

त्या अनुषंगाने ऑनलाइन अर्ज कसा करायचा, याबाबतही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सदर बैठकीत महिला, मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बारामती पोलीस उपविभागाचे निर्भया पथकमधील महिला पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी महिला सुरक्षा, Dail 112 बाबत सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर यांनी व आभार प्रदर्शन गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *