वाकड, 08 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथकाने बुधवारी (दि.08) वाकड आणि डांगे चौक परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. यावेळी वाकड आणि डांगे चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. सोमवारपासून तेथील सर्व बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्याआधी पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून ती जागा रिकामी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती, याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रादेशिक अधिकारी श्रीकांत कोलाप यांनी माहिती दिली.
https://x.com/ANI/status/1876928760139985254?t=PHlpuL2bm7VrL093TEOYGg&s=19
पालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील वाकड आणि डांगे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. यासंदर्भात महानगरपालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार, अशी अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. यामध्ये त्यांना दोन दिवसांच्या आत संबंधित जागा रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पीसीएमसीच्या पथकाने अतिक्रमणविरोधी धडक कारवाई करून अनधिकृत बांधकामे पाडली आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पालिकेच्या या कारवाईची चर्चा सध्या सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अतिक्रमण न करण्याचे तसेच शहराच्या विकासास मदत करण्याचे आवाहन केले आहे. या अतिक्रमणविरोधी मोहिमेने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली असून, बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू राहतील, असे प्रशासनाने सांगितले. तसेच अशा कारवाईसाठी कोणतीही प्रकारची तडजोड केली नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेने शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. नागरिकांनी देखील प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणांची समस्या निश्चितपणे कमी होईल अशी अपेक्षा आहे.