बारामती, 5 एप्रिलः महाविकास आघाडीच्या सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे वयोवृद्ध नेते माननीय शरद पवार यांनी अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार देऊन आंबेडकरवाद्यांशी गद्दारी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीयदृष्ट्या मोठं मन करून बारामती, नागपूर व कोल्हापूर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील समन्वयाची परंपरा राखून मतविभाजनाचा धोका टाळून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठींबा जाहीर केला. ज्याच्या बदल्यात राजकीय हितसंबंध जोपासताना बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर न करण्याचे साहसरम्य पाळले नाही.
महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा, महाविकास आघाडीचे शिल्पकार माननीय शरद पवार यांनी राजकीय उपकाराची परत फेड केली नाही. गांधी, नेहरू घराण्याची लोकं संसदेत जाण्यासाठी जीवाची अकांतिकेचा प्रयत्न करणारे पवार आंबेडकर घराण्याचे नातू संसदेत जाऊ नये, म्हणून जीवाच्या अकांतिकेने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील समतावादी, आंबेडकरी समाज महाविकास आघाडीवर नाराज आहेत. तर बारामती लोकसभा मतदार संघातील आंबेडकरी समाजाने व समतावादी, धर्मनिरपेक्षक लोकांनी सुप्रिया सुळेंना पाडण्याचा विडा उचलला असून गावोगावी दलित वस्तींमध्ये घुंगडी बैठका चालू झाल्या आहेत.
समाज माध्यमांवरती आंबेडकरी घराण्याशी केलेल्या गद्दारी बद्दल जाब विचारला जात असून शरद पवारांना त्यांनी केलेल्या गद्दारीची चोख उत्तर देण्याचे निर्धार तरुण पिढीने केला आहे. स्वातंत्र काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी संसदेची दारे-खिडकी बंद करणारी प्रवृत्ती आजही समाजामध्ये जिवंत आहे. आंबेडकरी घराण्याला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी काही मनूवादी आवलादी कार्यरत असून अशी प्रवृत्ती जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत या देशात राजकीय, सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही. या निवडणुकीमध्ये गाढणे आगत्याचे आहे, असा निर्धार आंबेडकरी समाजाने केला आहे.