संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू! आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर

दिल्ली, 22 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (दि. 22 जुलै) सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2024-2025 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर करणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी निर्मला सीतारामन यांनी आज 2023-2024 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला आहे. त्यानंतर हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज दुपारी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात देशाची अर्थव्यवस्था कशी होती? हे या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालावरून कळते. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी देशात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जातो.

https://x.com/AHindinews/status/1815275048502239396?s=19

https://x.com/ani_digital/status/1815286362955809094?s=19

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2024-25 मध्ये 6.5 ते 7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे या आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या 2023-24 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, भू-राजकीय आव्हानांचा सामना करताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर स्थितीत आहे. या सर्वेक्षणात जीडीपी वाढ, महागाई, रोजगार, वित्तीय तूट यासह अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे तेंव्हा आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला नव्हता. म्हणून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्वेक्षण सादर केला आहे.

सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार

दरम्यान, उद्या संसदेत सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प हा एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या सकाळी 11 वाजता देशाचा 2024-2025 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचबरोबर निर्मला सीतारामन या एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. निर्मला सीतारामन या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या पहिल्या केंद्रीय अर्थमंत्री ठरणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा केल्या जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *