पंतप्रधान मोदींनी फडणवीस सरकारचे कौतुक केले

दिल्ली, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.01) गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.02) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून महाराष्ट्र सरकारच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले.

https://x.com/narendramodi/status/1874681423933694403?t=jQ3888q9M5oEaLZX1fdtMA&s=19

पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटले?

“दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन!,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी:
1) 11 जहाल नक्षलवादी शरण आले.
2) स्वातंत्र्याच्या 77 वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरू.
3) लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, 6,200 कोटींची गुंतवणूक आणि 9,000 रोजगार संधी निर्माण.
4) कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1,000 कोटींचे समभाग प्रदान.
5) गडचिरोलीपासून 200 किलोमीटर दूर पेनगुंडा येथे जवान आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
6) सी-60 जवानांचा सत्कार.
7) पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी आणि 30 मोटारसायकलींचे लोकार्पण.
8) गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टर हँगरचे लोकार्पण आणि नवीन हेलिपॅडचे उद्घाटन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *