पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न

बीड, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा (दि.24) बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंकजा मुंडेंनी ‘भगवान बाबा की जय’ असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “या माझ्या सभेला उन्हातान्हात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनसमुदायाचे मी आभार मानते. मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतके प्रेम मिळेल असे मला वाटले नव्हते. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचे हे उपकार कधीच फेडू शकत नाही. ज्यांना पदे देण्यात आली आहेत, ते माझ्या मेळाव्यापासून दूर जातील. पण माझी जनता कधीही माझ्यापासून दूर जाणार नाही. निवडणुकीत पडले तरी चालेल, पण कधी तुमच्या नजरेतून पडणार नाही. तसेच माझ्या कारखान्यावर धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी तुम्ही लोकांनी 2 दिवसांत 11 कोटी रुपयांचे चेक जमा केलेत. त्यामुळे मी तुम्हा लोकांचे आभार मानते.” अशा पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मुंबईत ठाकरे आणि शिंदे यांचा दसरा मेळावा


तसेच “राज्यातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणार. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मी तुम्हाला काय देऊ शकेल हे मला माहीती नाही, पण मी तुम्हाला स्वाभिमान मात्र नक्कीच देऊ शकते. याशिवाय, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. मी गोरगरिबांसाठी काम केले आहे. हे काम करताना मी जाती धर्म यांचा विचार कधीही केला नाही, मी लोकांचे पैसे नाही तर मी लोकांचा आशीर्वाद मात्र नक्की घेणार आहे. मी निवडणुकीत जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेऊ शकत नाही. तसेच माझ्यावर इतर कोणाचेही कर्ज नाही. माझ्यावर केवळ कर्ज तुमचं आहे. वेळ पडली तर, ऊस तोडायला किंवा पडल्यास कापूस वेचायला जाईन, पण मेहनतीचं खाईन. मी थकणार नाही, थांबणार नाही आणि मी कुणासमोर कधी झुकणार नाही. माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी लढत राहणार आहे,” असे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

मी राजकारणातून कायमचा बाजूला जातोय- निलेश राणे

One Comment on “पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *