बारामती, 20 डिसेंबरः बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 चे मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडले. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकींचा आज, 20 डिसेंबर 2022 रोजी निकाल जाहीर झाला आहे. बारामती तहसिल कार्यालयाकडून नुकताच पणदरे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर केला आहे.
पणदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि 15 सदस्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यात सरपंच पदासाठी अनुसूचित जातीमधून अजय कृष्णा सोनवणे हे विजयी झाले असून त्यांना 2324 मते मिळाली आहे.
तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग क्र. 1 मधून संगिता भरत कोकरे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 542 मते पडली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 1 मधून यगोती धैर्यशील कोकरे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 575 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 1 मधून मनोज अशोक जगताप हे विजयी झाले असून त्यांना 517 मते मिळाली आहेत.
अनुसूचित जाती प्रभाग क्र. 2 मधून निखील विलास गायकवाड हे विजयी झाले आहेत. त्यांना 515 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 2 मधून कोमल संतोष बनकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना 621 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 2 मधून विक्रम भरत कोकरे हे विजयी झाले असून त्यांना 596 मते मिळाली आहेत.
कुरणेवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्र. 3 मधून निशा महादेव शिंदे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 509 मते मिळाली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र. 3 मधून प्रविण नवनाथ कोकरे हे विजयी झाले आहेत. त्यांना 504 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 3 मधून योगेश लक्ष्मण कदम हे विजयी झाले असून त्यांना 465 मते मिळाली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्र. 4 मधून निलेश नारायण कोकरे हे विजयी झाले आहेत. त्यांना 389 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 4 मधून सुप्रिया प्रल्हाद सोनवणे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 501 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण प्रभाग क्र. 4 मधून सत्यजित संभाजी जगताप हे विजयी झाले असून त्यांना 515 मते मिळाली आहेत.
अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्र. 5 मधून रेखा शशिकांत सोनवणे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 610 मते मिळाली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग क्र. 5 मधून पल्लवी रमेश रासकर या विजयी झाल्या आहेत. त्यांना 598 मते मिळाली आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्र. 5 मधून रेखा नितीन जगताप या विजयी झाल्या असून त्यांना 480 मते मिळाली आहेत.
मुरुम ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!
2 Comments on “पणदरे ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर!”