शहरातील ठराविक अतिक्रमणांवर पालिका मेहरबान?

बारामती, 5 ऑगस्टः (प्रतिनिधी/ कार्यकारी संपादक- अभिजीत कांबळे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीचा कारभार हातात घेताच बारामती शहरातील रखडलेली विकासाची कामे पुन्हा जोमाने सुरु झाली आहेत. सदर कामे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जलद गतीने करण्यात येत आहेत. यामुळे शहरासह परिसरात मोक्याच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी बारामती नगर परिषद सरसावली आहे. मात्र सदर अतिक्रमणे सरसकट काढण्याऐवजी ठराविकच अतिक्रमणांवर बानप मेहरबान झाल्याची चित्र सध्या बारामती शहरात दिसत आहे.

संभाजी भिडेंच्या वक्त्याव्याचे निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

बारामती शहरातील पुर्वीचा तीन हत्ती चौकात भारतीय रेल्वेच्या जागेतील गुल पुनावाला गार्डन शेजारी असणारी अतिक्रमणे बारामती नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाद्वारे काढण्यात आली. सदर अतिक्रमण काढण्यात बानपकडून दुजाभाव केल्याचा आरोप अतिक्रमणधारकांकडून होताना आता दिसत आहे. सदर अतिक्रमण काढताना पालिकेने कोणतीही पूर्व परवानगी दिली नसल्याचेही अतिक्रमणधारकांनी भारतीय नायकशी बोलताना सांगितले. तसेच गरीबांची अतिक्रमणे बानपने पाडली असून या कारवाईमुळे त्यांचा रोजगार देखील बंद झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. मात्र शेजारी असलेले पतंजली चिकित्सालय आणि स्टोअर्स या दुकानावर जाणून बुजून कारवाई केली गेली नसल्याचा आरोप होत आहे.

जिरायत भागासाठी वरदान ठरलेला पुरंदर उपसा शेतकऱ्यांना उपयुक्त?

एकीकडे शहराचा विकास करण्यासाठी बेकायदेशीर पत्रा शेड, बांधकाम अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा चालवायचा, तर दुसरीकडे कारवाई करताना दुजाभाव करायचा? शहराच्या विकासाच्या आड येणारे ही अतिक्रमणे काढण्यात बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे हे अतिक्रमण विभागाला आदेश देतील का? की या बेकायदेशीर पत्रा शेड अतिक्रमणांना अभय देणार? हे येत्या काही दिवसांत बारामतीकर पाहणार आहेत.

2 Comments on “शहरातील ठराविक अतिक्रमणांवर पालिका मेहरबान?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *