कोलकाता, 11 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पाकिस्तानचा संघ अखेर विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळविण्यात आला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी बाद 337 धावा केल्या होत्या. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तान संघाला हा सामना 6.2 षटकांत जिंकावा लागणार होता. मात्र, ही गोष्ट अशक्य असल्याने या सामन्यात पाकिस्तानने 6.4 षटकांत 2 बाद 30 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे.
https://twitter.com/ICC/status/1723372452279877981?s=19
भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; आरोपी फरार
दरम्यान विश्वचषकातून पाकिस्तान संघ बाहेर पडल्याने उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचे सामने आता भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे 4 संघ खेळणार आहेत. यामध्ये भारतीय संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असल्याने भारताचा सामना चौथ्या क्रमांकावरील न्युझीलंडशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. तर सेमी फायनलचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
तत्पूर्वी आज पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 337 धावा केल्या होत्या. यामध्ये बेन स्टोक्स (84) आणि ज्यो रूट (60) यांनी चांगली फलंदाजी केली. तर पाकिस्तानकडून हरीस रौफ याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
पंतप्रधान मोदींच्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन
तर या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 244 धावाच करता आल्या. त्यांचा डाव 43.3 षटकांत संपुष्टात आला. पाकिस्तान तर्फे आघा सलमान याने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर त्यांच्या अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी पाकिस्तानचा संघ या सामन्यात 93 धावांनी पराभूत झाला. इंग्लंड तर्फे डेव्हिड विली याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
2 Comments on “पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर; उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट”