पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर!

चेन्नई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी (दि.27) दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांचे हे लक्ष आफ्रिकेने 47.2 षटकात 9 गडी गमावत पूर्ण केले. या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाचे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर दुसरीकडे हा सामना जिंकल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत 10 गुण आणि चांगल्या रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

रोहित पवारांची युवा संघर्ष पदयात्रा स्थगित

तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत सर्वबाद 271 धावा केल्या होत्या. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने 50 आणि सौद शकील याने 52 धावांची खेळी केली. याबरोबरच शादाब खान 43 आणि मोहम्मद रिझवान याने 31 धावा केल्या. तर पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. यामध्ये आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने 10 षटकांत 60 धावा घेत पाकिस्तानचे 4 फलंदाजांना बाद केले. यासोबतच मार्को जेन्सन 3, जेराल्ड कौट्झी 2 आणि लुंगी एनगिडीने 1 गडी बाद केला. त्यामुळे पाकिस्तानला 300 धावांच्या आत रोखता आले.

आयपीएल 2024 चा लिलाव होणार परदेशात!

त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक 14 चेंडूत 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट शाहीन आफ्रिदीने घेतली. मग 67 धावांत आफ्रिकेला दुसरा धक्का बसला. यावेळी कर्णधार टेम्बा बावुमा 28 धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद वसीम ज्युनियर ने बाद केले. त्यानंतर संघाची धावसंख्या 121 असताना तिसरी विकेट पडली. तेंव्हा रॅसी व्हॅन दुर डुसेन 21 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या एडन मार्कराम ने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत एक बाजू लावून धरली. त्याने इतर फलंदाजांसोबत छोट्या भागीदारी करून 91 धावांची शानदार खेळी केली. मात्र संघाला विजयासाठी 58 चेंडूत 19 धावा असताना एडन मार्कराम बाद झाला. त्यानंतर आफ्रिकेच्या तळातील फलंदाजांनी राहिलेल्या 19 धावा करीत संघाला विजय मिळवून दिला. तर या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ही चांगली कामगिरी केली. यामध्ये शाहीन आफ्रिदीने 3 तर हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दरम्यान, या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ जवळपास उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

2 Comments on “पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *